माऊलींच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने, कुठे वाद तर कुठे सर्वधर्मीय स्वागत

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सासवडमध्ये हिंदूं बरोबरच मुस्लिम समाजानेही स्वागत केले. वारकऱ्यांचा मु्स्लिम समाजाने इथे पाहूणचार ही केला.

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

देवा राखुंडे

संत तुकाराम महाराजांसह संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेने रवाना झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सासवडमध्ये हिंदूं बरोबरच मुस्लिम समाजानेही स्वागत केले. वारकऱ्यांचा मु्स्लिम समाजाने इथे पाहूणचार ही केला. तर  दुसरीकडे तुकाराम महाराजांची पालखी उरुळी कांचन इथे पोहचल्यानंतर ग्रामस्थ आणि पालखी सोहळ्याचे प्रमुख यांच्यात वाद झाला. मात्र त्यानंतर पोलिस अधिक्षकांनी त्यात मध्यस्थी करत हा वाद मिटवला. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सासवडमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन झालं. संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सासवड मुक्कामी होता. यावेळी या पालखी सोहळ्यामध्ये आलेल्या लाखो वैष्णव भक्तांचं मुस्लिम बांधवांकडून स्वागत करण्यात आले. शिवाय त्यांचं चहापानाची जबाबादारीही मुस्लिम बांधवांनी घेतली. दरवर्षी ही परंपरा जपली जाते. सासवडचं नाही तर  पुरंदरमधील मुस्लिम एबीसी संघटनेकडून ही वारकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली.  

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - लाडकी बहीण योजनेत आता 'या' कागदपत्रांची नाही गरज

मात्र उरुळी कांचन इथे संत तुकाराम महाराजांची पालखी पोहोचल्यानंतर ग्रामस्थांनी महामार्गावरच थांबून पालखी सोहळ्याचा नगारा अडविला.दुपारचा विसावा हा परंपरेनुसार ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरात करावा अशी विनंती करण्यात आली. त्यावरून पालखी सोहळ्याचे प्रमखांबरोबर वाद ही झाला. उरुळी कांचन ग्रामस्थ पालखी गावात नेण्यासाठी आक्रमक होते. त्याच वेळी तिथे पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख उपस्थित होते. त्यांनी ग्रामस्थांची समजूत काढली.त्यानंतर पालखी पुढे गेली. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - अजित पवारांच्या घरी डिनर डिप्लोमसीला नवाब मलिकांची उपस्थिती; नव्या चर्चेला उधाण

उरुळी कांचन येथील दुपारच्या विसाव्याची  परंपरा मोडीत काढून पालखी थेट यवतच्या दिशेने रवाना झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 60 वर्षाची परंपरा का मोडली असा आक्षेप ग्रामस्थांनी घेतला. 1997 साली असाच वाद झाला होता. त्यावेळी रामकृष्ण मोरे यांनी हा वाद मिटवला होता. हा वाद सध्या मिटला असला तरी परंपरा का मोडली यावरून दावे प्रतिदावे कायम आहेत. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - लाडकी बहीण योजनेत झाला मोठा बदल, आता 'या' महीलांनाही मिळणार लाभ

संत तुकाराम महाराज पालखी सोहळा कदम वस्ती येथे मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मुक्कामी पोहोचला होता. मुक्काम आटोपल्यानंतर पालखी सोहळा लोणी काळभोर आणि कदमवाकवस्ती ग्रामस्थांचा निरोप घेऊन आज बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाला. थेऊरफाटा, कुंजीरवाडी, नायगाव फाटा, सोरतापवाडी, इनामदार वस्ती येथील ग्रामस्थांच्या शुभेच्छा घेत पालखी सोहळा उरुळी कांचन येथे दुपारी सव्वा एकला पोहोचला. त्यानंतर हा पालखी सोहळा विसाव्याला न थांबता थेट यवतच्या दिशेने मार्गस्थ झाला. त्यामुळे उरुळी कांचन येथे पालखी सोहळा पोहचल्यानंतर ग्रामस्थांनी महामार्गावरच थांबून पालखी सोहळ्याचा नगारा अडविला होता.